पिंपरी ,४( punetoday9news):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या चिखली येथील घरकूल प्रकल्पातील सदनिकांची तपासणी आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या पथकाने केली.
आर्थिक दुर्बल घटकासाठी उभारण्यात आलेल्या या प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांना सदर सदनिका १० वर्षा पर्यंत विकतां येत नाही तसेच भाड्याने देतां येत नाही .या अटींचे उल्लंघन झाल्यास सदर लाभार्थ्याचा लाभ रद्द करून ताब्यात घेण्याची तरतूद आहे

त्यासाठी आज विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली.
५८३८ सदनिकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये १२२३ सदनिका बंद आढळून आल्या.१९८ सदनिकांमध्ये भाडेकरू आढळून आले .तर दोन सदनिका विक्री झाल्याचे आजच्या प्राथमिक तपासणीत आढळून आले.

सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मोहीमेत कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप यांच्या सह १४ मंडलाधिकारी, वरिष्ठ लिपीक, लिपीक,मजूर व शिपाई असे १८९ कर्मचारी सहभागी होते.

चिखली पोलीस स्टेशनचे निरीक्षक सतीश माने यांच्या उपस्थितीत व ३५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही तपासणी मोहीम राबवण्यात आली.

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!