औंध,दि.५( punetoday9news):- जनता शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यामंदिर,औंध,पुणे या प्रशालेने शिक्षक दिनी ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ हा अनोखा उपक्रम राबविला.
कोरोना च्या प्रादुर्भावामुळे गेली 2 वर्ष शाळा बंद आहेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळेचे ऑनलाइन तास दररोज चालू आहेत.
जनता शिक्षण संस्थेच्या “बलविद्यामुपास्व” या ब्रीद वाक्यासह ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ या उपक्रमाअंतर्गत शिक्षक दिनी शिक्षक विद्यार्थी आणि पालकांच्या भेटीला ” देवाचीये द्वारी ” हा शीर्षक असलेला आगळावेगळा उपक्रम प्रशालेने राबविला.
विद्यार्थी हेच आपले दैवत आहेत . शिक्षक दिनी विद्यार्थी शिक्षकांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे व शासनाच्या निर्बंधामुळे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षकच विद्यार्थी व पालकांच्या भेटीला जाऊन त्यांच्या अडीअडचणी,समस्या जाणून घेऊन शालेय प्रशासन, शिक्षक तसेच समाजातील दानशूर व्यक्तींच्या देणगीतून शालेय साहित्य भेट देत आहेत त्यामुळे शाळा आणि पालक यांच्यामध्ये विश्वासाचं नात दृढ होताना दिसते.
शालेय परिसरातील इंदिरा गांधी वसाहत,गावठाण तसेच पिंपळे निलख या ठिकाणचे सर्वात जास्त विद्यार्थी प्रशालेत शिक्षण घेत आहेत .संबंधित प्रशालेतील प्राचार्य,पर्यवेक्षिका तसेच सर्व शिक्षकांनी कोरोनासारख्या महामारीचे भय न बाळगता शासकीय नियमांचे पालन करून इंदिरा गांधी वसाहत, औंध गावठाण तसेच पिंपळे निलख याठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पालक आणि विद्यार्थ्यांची भेट घेत आहे यातून एक चांगला संदेश समाजात जात आहे.
प्रशालेत विद्यार्थ्यांच्या अनुपस्थित शिक्षक दिन साजरा करण्यात आला . प्रशालेचे प्राचार्य, पर्यवेक्षिका यांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर सेवकांना शालेय प्रशासनाच्या वतीने गुलाबपुष्प व पेन देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाने केले.
Comments are closed