“हिमालय ही थरथर कापतो, जेव्हा सह्याद्री उभा राहतो.
जेव्हा शिवरायांचा तानाजी चालू लागतो.
तेव्हा स्वराज्याचा भगवा अभिमानाने डोलू लागतो.”
सांगवी,दि.५( punetoday9news):-
सलग १२ वर्षे एकही रविवार न चुकता सिंहगड ट्रेक करणा-या फिनिक्स कडून शिवप्रेमी शंकर जगताप यांचा सन्मान.
सांगवी,दि.५( punetoday9news):- शौर्याचे व स्वराज्यनिष्ठेचे प्रतिक असलेल्या सिंहगडावरिल नरविर तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या देखभालीचे चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टने दायित्व स्विकारल्या बद्दल ट्रस्टचे अध्यक्ष शिवप्रेमी माजी नगरसेवक शंकर जगताप यांचा सिंहगडावर जुनी सांगवी येथील फिनिक्स ट्रेकर्स ग्रुपकडून मावळा पगडी,पंचधातुची शिवमुद्रा व सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.
तरुण युवापिढीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, इतिहास मनात रूजविण्यासाठी ऑक्टोबर २००९ पासुन जुनी सांगवीतील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन यांच्यावतीने फिनिक्स ट्रेकर्स कडून दुर्गभ्रमंती,गड स्वच्छता व तरूणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण होण्यासाठी युवकांचा फिनिक्स ट्रेकर्स ग्रुप सुरू करण्यात आला.२००९ पासुन सलग १२ वर्षे एकही रविवार न चुकता आजपर्यंत त्यांनी सिंहगड ट्रेक,परिसराची स्वच्छता,केली आहे.निर्व्यसनी तरुणांची फळी निर्माण व्हावी.यातुन आदर्श युवक घडावा ही या मागील संकल्पना असून शिवप्रेमी मंडळींचा या उपक्रमात सहभाग असतो.ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचे चंद्ररंगचे अध्यक्ष माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी सांगितले.
यावेळी फिनिक्सचे अध्यक्ष संतोष कांबळे, राहुल विधाटे, हर्षल संतोष कांबळे, ईश्र्वर काटे,गोते,नेताजी चिवरे,हेमंत पाडुळे, शिवाजी निम्हण, आर्यन जगताप, विरेंद्र जगताप, ऐश्वर्या रेणुसे, निमिष कांबळे, रविंद्र यादव, संजय जगताप, विक्रम कदम, संदिप गायकवाड यांच्या हस्ते मावळा पगडी, शिवमुद्रा व सन्मानपत्र देवून शंकर जगताप यांना सन्मानित करण्यात आले.
सिंहगडावरिल नरविर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळ परिसराचे देखभाल दायित्व स्विकारल्याबद्दल जुनी सांगवीतील फिनिक्स ट्रेकर्स ग्रुपकडून शंकर जगताप यांचा सत्कार करण्यात आला.
Comments are closed