सांगवी,दि.७( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील माहेश्वरी चौक येथील शिव शंकर मुर्तीस श्रावणी सोमवार निमित्ताने अभिषेक घालण्यात आला. कै.दत्तात्रय भोसले यांच्या स्मृतीपित्यार्थ शिवामृत वाॅटर सप्लायर्स च्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून विधिवत पूजा करण्यात आली.
यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, शिवामृत ग्रुपचे संचालक विजयसिंह भोसले,मारुती जाधव, संतोष ढोरे, अरुण पवार, शशिकांत देवकांत, चंद्रकांत भिसे, सुरेश भोजणे, अरविंद इंदलकर,राजू सावळे व भाविक उपस्थित होते.
श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर उपवास , धार्मिक कार्यक्रम , कीर्तन सप्ताह , नामसप्ताहासह अनेक कार्यक्रम या महिन्यात आयोजित केले जातात . शहरात असलेल्या शिवमंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात शिवलीला अमृताचे पारायण केले जाते . मात्र यावर्षीही करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही . त्यामुळे यंदा भाविकांचा हिरमोड झाला असला तरीही कोरोनाला अटकाव घालण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून साधेपणाने पूजा अर्चना केली.
Comments are closed