पुणे, दि. 8( punetoday9news):- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा विषय घेऊन विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
उप निवडणुक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी या स्पर्धेबाबत जिल्हा स्तरावरील नियोजन केले आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना देखाव्यांच्या आयोजनावर असलेली बंधने लक्षात घेऊन घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. घरोघरी छोटेखानी देखावे साकारले जातात. अशा देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील दिला जातो. या स्पर्धेचा विषय ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा हा आहे. मताधिकार हा १८ वर्षावरील नागिराकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे. हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये, नातेवाईकांमध्ये मतदार नाव नोंदणी, वगळणी यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पड़ता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर घरगुती गणेशोत्सव सजावटीतूनही जागृती करता येऊ शकते. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमांवर स्पर्धेची नियमावली देण्यात आलेली आहे.
या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, तसेच मतदार नाव नोंदणी आणि वगळणी यांसाठी प्रसार-प्रचार केला जाणार आहे. गणेश मंडळाच्या मंडपात आणि ऑनलाइन माध्यमांद्वारेही जागृती केली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी अधिकाधिक नागरिकांना या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
दि. १ जानेवारी २०२२ या अर्हतादिनावर आधारित मतदार याद्यांच्या पुनरीक्षणांचा कार्यक्रम दि. १ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होत आहे. यामध्ये १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांच्या नोंदणीसाठी अर्ज स्वीकारले जातील.
स्पर्धेची नियमावली
१. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
२. सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकाने पुढीलप्रमाणे साहित्य पाठवावे
२.१ सदर विषयाला अनुसरून केलेल्या सजावटीचे विविध कोनातून काढलेले पाच फोटो पाठवावेत.
२.२ सदर फोटो मूळ स्वरूपातील असावेत, त्यावर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन,असे अधिकचे काही जोडू नये.
२.३ प्रत्येक फोटो हा जास्तीत जास्त २०० KB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावा.
पाचही फोटोंची एकत्रित साइज १mb पेक्षा जास्त असू नये
२.४ आपल्या सजावटीची ध्वनिचित्रफीत पाठवताना ती कमीत-कमी ३० सेकंदाची आणि
जास्तीत जास्त एक मिनिटाची पाठवावी.
२.५ चित्रफीत (व्हिडिओ) अपलोड करताना मूळ रूपात आहे त्या स्वरूपात पाठवावी
कोणत्याही प्रकारे संपादित (एडिटिंग) करू नये. चित्रिकरण करताना देखाव्याचे वर्णन करतानाचा
आवाज मुद्रित (रेकॉर्ड) केल्यास चालेल.
२.६ ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत जास्त १०० mb असावी. तसेच, ही
ध्वनिचित्रफित mp4 फॉरमॅटमध्ये असावी.
३ स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या विषयावर पाच फोटो आणि चित्रफीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.
४. आपले फोटो आणि चित्रफीत https://forms.gle/६TQHaKSAhZmBbQFA या गूगल
अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत.
५. ज्या स्पर्धकांना फोटो किंवा चित्रफीत (व्हिडिओ) पाठवण्यास अडचण येईल, त्यांनी
अविराज मराठे ७३८५७६९३२८,

प्रणव सलगरकर ८६६९०५८३२५

या व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश (मेसेज पाठवून कळवावे.
६. दिनांक १० सप्टेंबर २०२१ ते १९ सप्टेंबर २०२१ या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी
ग्राह्य धरले जाईल.
बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल
अ. प्रथम क्रमांक: २१,०००/
ब. द्वितीय क्रमांक :- ११,०००/
क. तृतीय क्रमांक :- ५,०००/

ड. उत्तेजनार्थ:- १००० रुपयांची एकूण दहा बक्षिसे
८ सहभागी सर्व स्पर्धकांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती याच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्र देण्यात येईल.
९. आलेल्या सर्वोत्तम सजावटी निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक
१०. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व गितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची असेल.
११. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल.

असे सांगण्यात आले आहे.

 

 

या आठवड्यातील प्रश्न : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२२ . महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार ? तुमचे मत नोंदवा.

View Results

Loading ... Loading ...

 

Comments are closed

error: Content is protected !!