पुणे, दि. 9( punetoday9news):-  नागरिकांनी त्यांच्या मोबाईल मध्ये वोटर हेल्पलाईन ॲप (Voter Helpline App) डाऊनलोड करुन मा. भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
सद्यस्थितीमध्ये भारत निवडणूक आयोगाचा मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम 9 ऑगस्ट 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत राबविला जात असून त्यानुसार प्रारुप मतदार यादी 01 नोव्हेबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविणे, मतदार ओळखपत्राच्या तपशिलात बदल करणे, तसेच, कुंटूबातील मयत सदस्याचे नावे वगळावयाचे असल्यास किंवा स्थंलातरित नागरिकांना त्यांचे नाव वगळणे व इतर ठिकाणी नाव समाविष्ट करणे इ. सुकर होण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी वोटर हेल्पलाईन ॲप (Voter Helpline App) विकसित करण्यात आलेले आहे. हे ॲप मतदारांना Play Store (Android ) / App Store ( ios ) मधून डॉऊनलोड करता येणार आहे.

 

या आठवड्यातील प्रश्न : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२२ . महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार ? तुमचे मत नोंदवा.

View Results

Loading ... Loading ...

 

 

Comments are closed

error: Content is protected !!