● आयुक्तांनी भेट नाकारल्याने संतापलेल्या नगरसेविकेने हा प्रकार केल्याची माहिती.
पिंपरी,दि.९ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेत भाजपच्या नगरसेविका आशा शेडगे या प्रभागातील समस्या घेऊन आयुक्तांना भेटण्यासाठी गेल्या होत्या . मात्र , आयुक्त भेटले नाहीत याचाच राग अनावर झाल्याने शेडगे यांनी आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकली अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे . या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आशा शेडगे यांच्या प्रभागात सध्या रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे . काही ठिकाणी खड्डे असून ते बुजवण्यासाठी संबंधित ठेकेदाराला सांगितले . परंतु , ठेकेदाराकडून खड्डा बुजवण्यात आला नाही . हीच समस्या घेऊन शेडगे या आज महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील यांना भेटण्यास गेल्या होत्या . मात्र , आयुक्त इतर दुसऱ्या कामामुळे नगरसेविका शेडगे यांना भेटू शकले नाहीत.याचाच राग अनावर झाल्याने काही महिलांसह त्यांनी आयुक्तांच्या फलकावर शाई फेकली अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे . या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आठ महिला आणि दोन तरुणांना ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याच काम सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली .
Comments are closed