सांगवी,दि.९( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी पोलीस स्टेशन तपास पथकाने अचूक माहितीच्या आधारे देशी बनावटीचा गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीस पकडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगवी पोलिस स्टेशनचे चंद्रकांत भिसे ,शशिकांत देवकांत यांना नॅशनल स्कुलजवळ , पवनानगर जुनी सांगवी येथे गावठी कट्टा ( पिस्टल ) घेवुन इसम येणार असल्याची गोपनिय बातमी मिळाली. त्या आधारे सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे यांनी कारवाईचे आदेश दिले.
पोलीस भिसे , केंगले , देवकांत , सुर्यवंशी , देवकर यांच्या टीमने सापळा रचुन आरोपी मौलाली रहीम शेख (वय २० वर्षे रा. जयमाला नगर ६ , जुनी सांगवी पुणे मुळ मुनोळी जि.गुलबर्गा, कर्नाटक) यास अटक केली.
सदरची कामगिरी कृष्णप्रकाश, पोलीस आयुक्त , पिपरी चिंचवड , संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त , आनंद भोईटे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ २ , श्रीकांत डिसले सहा . पोलीस आयुक्त , वाकड विभाग , पिंपरी चिंचवड , यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल टोणपे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सांगवी पोलीस ठाणे , सहा . पोलीस निरीक्षक सतिश कांबळे , चंद्रकांत भिसे , कैलास केंगले , सुरेश भोजणे , पोलीस नाईक शशिकांत देवकांत , सचिन सुर्यवंशी , अनिल देवकर , प्रविण पाटील , विजय मोरे , प्रमोद गोडे , विवेक गायकवाड , अरुण नरळे , नितीन खोपकर , हेमंतकुमार गुत्तीकोंडा यांनी केली आहे .
Comments are closed