पुणे दि.13 (punetoday9news):- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत जिल्हयात 100 दिवसांचे स्थायीत्व व सुजलाम अभियानास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हयातील सर्व गावामध्ये विविध उपक्रम 25 ऑगस्ट 2021 पासून पुढील 100 दिवसांचे स्थायित्व व सुजलाम अभियान राबविण्याच्या सूचना राज्यस्तरावरुन सुचित केलेले आहे. त्यानुषंगाने स्थानिक गाव पातळीवर लोकसहभागाच्या माध्यमातून सामुदायिक स्तरावर हागणदारीमुक्त शाश्वततेचे परिणाम अधिक प्रभावीपणे साध्य करणे आणि ग्रामीण भागात शोषखड्यांच्या निर्मितीतून सांडपाणी व्यवस्थापन करणे, याबाबींचा समावेश आहे.
या अभियान दरम्यान राज्यस्तरावरुन पुणे जिल्हयात सांडपाणी व्यवस्थापनाकरिता 40 हजार (आंबेगाव 3 हजार, बारामती 4 हजार, भोर 2 हजार 500, दौंड, 3 हजार 500, हवेली 4 हजार, इंदापूर 4 हजार, जुन्नर 4 हजार, खेड 4 हजार, मावळ 2 हजार 500, मुळशी 1 हजार 700, पुरंदर 2 हजार 500, शिरुर 3 हजार 500 व वेल्हा 800) शोषखड्डे निर्मितीचे उद्यिष्ट देण्यात आलेले आहे.
या अभियानात सर्व गावांनी सहभाग घेवून आपले गावातील सांडपाणी व्यवस्थापना करिता शोषखड्डा निर्मीतीचेही आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
Comments are closed