पिंपरी, दि. १४( punetoday9news):- पुणे, पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्हा व टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन वतीने दि. 12 सप्टेंबर रोजी हॉटेल रत्नलोक मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
या बैठकीत टेनिस, व्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड, राज्य अध्यक्ष सुरेशरेड्डी, महासंघाचे अध्यक्ष आनंद खरे, राज्य कार्याध्यक्ष अनिल सोनवणे, गणपतराव बालवडकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त एन.डी.पखाले, राज्य महासचिव गणेश माळवे, शा.शि.महासंघ समन्वयक समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे , जिल्हा सचिव शेख फिरोज, आदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाली.
या बैठकीत टेनिसव्हॉलीबॉल महासंघास भारतीय क्रीडा मंत्रालय ची मान्यता मिळाल्या बदल महत्त्व पुर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्यतील संलग्नित जिल्हा सचिव उपस्थित होते.
शै.वर्ष 2021-22 चा राज्य क्रीडा स्पर्धा कार्यक्रम ची रुपरेषा ठरविण्यात आली.
वरीष्ठ गट – यवतमाळ, युवा व कनिष्ठ गट : अकोला, तर उप कनिष्ठ- मिनी गट: कोल्हापूर, या ठिकाणी स्पर्धा आयोजन करण्यात येणार आहेत.
राज्य संघटना विकासात्मक, आर्थिक दृष्टीने बळकट होण्यासाठी एस.के.पी.कँम्पस संस्थाध्यक्ष गणपतराव आप्पा बालवडकर यांची सर्वानुमते चेअरमन पदी निवड करण्यात आली. तसेच राज्य सहसचिव डॉ. दशरथ देसिंगे यांच्या राजीनामा मुळे रिक्त जागेवर सहसचिव पदी सर्वानुमते सांगली जिल्हा तील मिलिंद कुलकर्णी यांच्या निवड करण्यात आली.
बैठकीस राज्य सहसचिव किशोर चौधरी, डॉ. दशरथ देसिंगे, विभागीय सचिव रामेश्वर कोरड, हेमंत वाघ, जयदीप खोनखासकर, चेतन मानकर, अशोक शिंदे, प्रफुल्लकुमार बन्सोड,व जिल्हा सचिव सतिश नावाडे, किरण घोलप, प्रा.नागेश कान्हेकर, प्रमोद महाजन, शेख खमर, अशिष ओबेरॉय, सतिश राजगुरू, संतोष कोले, गणेश भोसले, राहुल पेटकर, किरण पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुञसंचालन महादेव फपाळ यांनी केले बैठकीतचे आयोजन पुणे जिल्हा पदाधिकारी फिरोज शेख , निवृत्ती काळभोर व सदस्य यांनी केले.
Comments are closed