पुणे, दि.१४ : पुणे जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार डॉ. किरण मोघे यांनी आज स्वीकारला. यापूर्वी ते नंदुरबार जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते.
यावेळी माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, माहिती सहायक संदीप राठोड यांच्या समवेत जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. मोघे यांनी नांदेड, रत्नागिरी, नाशिक, नंदुरबार येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून आणि मुख्यमंत्री सचिवालयात माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय येथे वरिष्ठ सहायक संचालक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.
Comments are closed