पुणे, दि. १६( punetoday9news):- पुणे महानगरपालिकेकडून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रास्ता पेठ पुणे या कार्यालयाकडे प्रत्येकी २ लाख प्रमाणे विविध प्रकारची एकूण ५ कामे बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायटयांना वाटपासाठी प्राप्त झाली असून अशा सोसायट्यांकडून परिपूर्ण प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.
बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायटयांना ३ लाखपर्यंतची शासकीय कामे विना निविदा देण्याबाबत शासन आदेश आहेत. त्यास अनुसरून पुणे जिल्हयातील कार्यरत असणाऱ्या व शासकीय कामे मिळण्यासाठी सर्व अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या तसेच या कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या बेरोजगारांच्या सेवा सहकारी सोसायटयांनी परिपूर्ण प्रस्तावासह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्तापेठ पुणे-११ या कार्यालयास दिनांक २३ सप्टेंबर २०२१ पूर्वी आपले परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त अनुपमा उ. पवार यांनी केले आहे.
Comments are closed