मुंबई, दि. 17( punetoday9news):- महाराष्ट्राच्या भूमीत विज्ञानवादी, सुधारणावादी विचार रुजवणारे क्रांतिकारी नेते, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आघाडीचं नेतृत्वं स्वर्गीय केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन त्यांना भावपूर्ण अभिवादन केलं आहे.

प्रबोधनकार ठाकरे यांना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रबोधनकार ठाकरे हे सुधारणावादी विचारांचे कृतीशील नेते होते. समाजातील वाईट रुढी, परंपरा, जातीव्यवस्था, अस्पृश्यतेवर त्यांनी प्रहार केला. बालविवाह, केशवपन, हुंडाप्रथेसारख्या रुढींविरुद्ध प्रखर लढा दिला. ते खऱ्या अर्थानं ‘प्रबोधन’कार होते. लेखक, पत्रकार, इतिहास संशोधक म्हणूनही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील आघाडीचं नेतृत्वं म्हणून त्यांचं योगदान खुप मोठं आहे. त्यासाठी ते महाराष्ट्राला नेहमीच आदरणीय राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी प्रबोधनकारांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!