भोसरी, दि. १८( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसी परिसरात ड्रायव्हर ने कामावरून काढल्याच्या वादातून चक्क मालकाच्या २२ लाखांच्या कार पेटवल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विनोद भस्के हा फिर्यादी यांच्याकडे गेल्या तीन वर्षांपासून वाहनचालक ( ड्रायव्हर ) म्हणून काम करत होता . दरम्यान , विनोद याने फिर्यादी यांची दुसरी मोटारकार ( स्विफ्ट ) ही गावाकडे जाण्यासाठी म्हणून दहा दिवसांसाठी घेऊन गेला . मात्र , महिना झाला तरी मोटार आणून दिली नाही . त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांचा शोध घेऊन ते त्याच्या घरापर्यंत पोहचले . मोटारी विषयी विचारले तेव्हा त्याचा भाऊ अंकित याने त्यांच्याशी वाद घातला , असे फिर्यादीत म्हटले आहे .
नंतर तीच स्विफ्ट आरोपीने नुकसान करून आणून दिली असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे . त्यानंतर विनोदला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे . दरम्यान , चार दिवसांपूर्वी आरोपी विनोद आणि त्याचा भाऊ अंकित यांनी फिर्यादी राहात असलेल्या सोसायटीमध्ये जाऊन क्रेटा आणि इनोव्हा गाड्या पेटवून दिल्याचा आरोप केला आहे .
या याप्रकरणाविषयी भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Comments are closed