पिंपरी,दि.२०( punetoday9news):- पिंपरी-चिंचवडमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेले दोन तरुण इंद्रायणी नदीमध्ये बुडाल्याची घटना घडली असून एकाचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे . ही घटना सायंकाळी ६ च्या सुमारास घडली असून सध्या दुसऱ्याचा शोध सुरू असून अंधार असल्याने शोधकार्य थांबविण्यात आले आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारे यांनी दिली आहे .

दत्ता ठोंबरे ( वय -२० ) आणि प्रज्वल काळे ( वय -१८ ) अशी नदीमध्ये बुडालेल्या तरुणांची नाव आहेत . यापैकी , प्रज्वल काळे याचा मृतदेह आढळला आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दत्ता ठोंबरे आणि प्रज्वल काळे कुटुंबासह आळंदी रोडवरील इंद्रायणी नदीमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी गेले होते . कुटुंबातील काही सदस्य हे नदीच्या काठावर थांबले होते . दरम्यान , दत्ता आणि प्रज्वल यांच्यासह नदीमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी नितीन ठोंबरे , शिवाजी ठोंबरे हे पाण्यात उतरले होते . दत्ता आणि प्रज्वल यांनी गणपती बाप्पांचे इंद्रायणी नदी पात्रात जाऊन विसर्जन केले . तेव्हा , विसर्जन झाल्यानंतर दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले , दोघांना पोहायला येत नव्हते . अशी माहिती पोलिसांनी दिली आहे . त्या दोघांना वाचवण्यासाठी नितीन आणि शिवाजी यांनी प्रयत्न केले . परंतु , ते दिसेनासे झाल्यानंतर नदीच्या बाहेर आले . घटनेची माहिती भोसरी MIDC पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली . प्रज्वल चा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे . दत्ता ठोंबरे याचा शोध सुरू असून अंधार झाल्याने रात्री उशिरा शोधकार्य थांबवले आहे. अशी माहिती भोसरी MIDC पोलिसांनी दिली आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!