पुणे दि.20 ( punetoday9news):- केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 21 सप्टेंबर 2021 रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन व 28 सप्टेंबर 2021 रोजी मॉप अप दिन संस्थास्तरावर शाळा/महाविदयालय सुरु आहेत अशा ठिकाणी तसेच समुदायस्तरावर 21 सप्टेंबर 2021 ते 28 सप्टेंबर 2021 राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व शालेय आरोग्य यांनी दिली आहे.
6 ते 19 वर्ष वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना संस्थास्तरावर शाळा/महाविदयालय सुरु आहेत अशा ठिकाणी शिक्षकांद्वारे तसेच 1 ते 19 वर्षे वयोगटातील अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयात न जाणाऱ्या लहान मुले व किशोरवयीन मुला-मुलींना आशाद्वारे समुदायस्तरावर घरोघरी जाऊन जंतनाशक गोळया देण्यात येतील, असेही अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व शालेय आरोग्य यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Comments are closed