बोपखेलमधील चौकाला बाळकृष्ण तात्याराव भालेराव गुरूजींचे नाव
पिंपरी, दि. २१( punetoday9news):- जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक म्हणून योगदान दिलेल्या शिक्षकाचा अनोखी भेट देऊन बोपखेल वासियांनी मोठा सन्मान केला आहे. बोपखेलमधील एका चौकाला ‘बाळकृष्ण तात्याराव भालेराव गुरूजी चाैक’ असे नाव दिले, असून या अनोख्या सन्मानाने भालेराव गुरुजी भारावून गेले.
या बाबतीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर हिराबाई घुले, नगरसेविका निर्मला गायकवाड, नगरसेवक विकास डाेळस यांनी पुढाकार घेतला. ही संकल्पना शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष चेतन घुले यांची होती. भालेराव गुरूजी यांनी बाेपखेलमध्ये शिक्षक म्हणून अनेक वर्षे सेवा केली. त्यानी अनेक विद्यार्थी घडवले. त्यांचे कित्येक विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. भालेराव गुरूजी हे बोपखेलच्या गणेशनगरमधील प्रथम रहिवासी असून, त्यांचे नाव चौकाला दिल्याने परिसरात एक चांगला संदेश गेला आहे, असे सांगत या भागातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपमहापौर हिराबाई घुले, नगरसेवक विकास डाेळस, माजी नगरसेवक भाऊसाहेब सुपे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष चेतन घुले, भालेराव गुरूजी, श्रीकांत घुले, काळुराम गाेडांबे, संजय सुपे, चासकर गुरूजी, कमलेश भालेराव, राजेश भालेराव जाधव गुरूजी, भिवसेन दांगट, किरण पाटाेळे, निलेश तिकाेणे, कुंडलिक बांबळे, पांडुरंग साबळे, विठ्ठल उंडे, अमित घुले, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वाजे, तसेच जुन्या नांदुरकी येथील माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, म्हाळुंगे गावचे माजी विद्यार्थी, देठे, महागाडे, पवार, वाजे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कमलेश भालेराव, राजेश भालेराव यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन व आभार आनंद भवारी यांनी केले.
Comments are closed