पिंपरी,दि.२२ ( punetoday9news):- जनता शिक्षण संस्थेच्या पुणे येथील श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय औंध पुणे येथील कला शिक्षक बिपीन शिवराम बनकर यांना यावर्षीचा ” गुरु गौरव ” राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून, आर्ट बिटस् फौंडेशन कडून हा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात येणार आहे.
शिक्षण क्षेत्रात शालेय स्तरावर मुलांसाठी राबविलेल्या कलाविषयक उपक्रमांची, कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. संस्थेचे अध्यक्ष पोपटराव देवकर आणि जनरल सेक्रेटरी सुभाष गारगोटे तसेच प्राचार्य राजू दिक्षित यांनी अभिनंदन करून कलाक्षेत्रातील पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
जनरल सेक्रेटरी सुभाष गारगोटे म्हणाले संस्थेचे आणि शाळेचे नाव उज्वल राखण्यात आमचे कलाशिक्षक नेहमी अग्रेसर असतात संस्थेला त्यांचा अभिमान आहे.
या पुरस्काराची माहिती देतांना
आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक संचालक संतोष पांचाळ म्हणाले की आर्ट बिटस् ही संस्था गेली वीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला या विभागातील कला आणि कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून कलाकारांसाठी अनेक उत्तम उपक्रम राबविले जातात.
Comments are closed