पुणे,दि.23 ( punetoday9news):-  गेली दीड वर्ष कोरोणामुळे शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन शिक्षण व यामध्ये येणारे अडथळे याचा सर्व परिणाम विद्यार्थी व पालकांच्या आरोग्यावर मानसिकतेवर झालेला दिसून येत आहे. याच अनुषंगाने राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत आज महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी च्या आदेशानुसार राज्य कार्याध्यक्ष शिक्षक नेते जी.के. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी व पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱी यांच्या शिष्टमंडळाने राज्याच्या शिक्षण खात्याच्या सर्व अधिका-यांची भेट घेऊन चर्चा करण्यात केली.

आयुक्त कार्यालयातील मोहिते, शिक्षण संचालक जगताप, शिक्षण उपसंचालक उकिरडे, सहाय्यक शिक्षण संचालिका मीना शेंडकर, पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वाखारे या सर्वांची शिष्टमंडळाने भेट घेऊन वरील गोष्टीवर चर्चा करून शाळा सुरू करण्यासंदर्भात संघटनेच्या वतीने निवेदन दिले.

शिष्टमंडळाबरोबर चर्चा करताना शाळा सुरू करण्याबाबत शासन अनुकुल असून लवकरच वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन शाळा सुरू होतील असे आश्वासन सर्व वरिष्ठ अधिका-यांनी दिले व शाळा सुरु करण्याबाबत शिक्षक संघटनांनी पुढाकार घेतल्या बाबत सर्वांचे अभिनंदनही केले. सदर निवेदनाची एक प्रत इ-मेल मार्फत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री , शिक्षण राज्य मंत्री तसेच शिक्षण सचिव यांना पाठविण्यात आली.

यावेळी पुणे शहर अध्यक्ष प्राचार्य शिवाजी कामठे, कार्यवाह संतोष थोरात, कार्याध्यक्ष प्राचार्य अविनाश ताकवले, पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन दुर्गाडे ,कार्यवाह संजय ढवळे, टीडीएफ विनाअनुदानित शिक्षक सेलचे अध्यक्ष अशोक धालगडे, पुणे शहर टीडीएफ चे उपाध्यक्ष सुनील गिरमे, द्वारकानाथ दहिफळे, राज मुजावर, जुनियर कॉलेज संघटनेचे शशिकांत शिंदे, उपाध्यक्ष संतराम इंदुरे, दत्ता भाले त्याचप्रमाणे संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!