पुणे दि.( punetoday9news):- शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी.ॲण्ड ए. बोर्ड) कडून जी.डी.सी.अँड ए. व सी.एच.एम. परीक्षा 2020ची परीक्षा दि. 22,23 व 24 मे, 2020 रोजी घेण्यात येणार होती. कोरोना संसर्गामुळे सदरची परीक्षा स्थगित करण्यात आली होती. ही परीक्षा 23,24 व 25 ऑक्टोंबर, 2021 रोजी घेण्यात येणार असल्याचे जी.डी.सी. ॲण्ड ए. बोर्ड चे सचिव तथा सहकारी संस्थेचे उपनिबंधक महेंद्र मगर यांनी कळविले आहे.
ज्या परिक्षार्थ्यांनी सन 2020 च्या परिक्षेसाठी अर्ज केलेले आहेत व ते स्विकृत झालेले आहेत असे परिक्षार्थी वरील परिक्षेस बसू शकतात.
10 फेब्रुवारी 2020 रोजीची परिक्षेची अधिसूचना व 22 सप्टेंबर 2021 रोजीचे शुद्धिपत्रक तसेच परीक्षेची सविस्तर माहिती सहकार खात्याच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर “महत्वाचे दुवे मधील जी.डी.सी.ॲण्ड ए. मंडळ” येथे उपलब्ध आहे, असेही मगर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Comments are closed