सांगवी,दि.२४ (punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात दि 3 जून रोजी नाशिकफाटा ब्रीज जवळील चालु बांधकाम साईडवरील ५ लाख रु. किंमतीचे साहित्य चोरीस गेले होते त्या संदर्भातील आरोपींना सांगवी पोलिसांनी दमदार कामगिरी करत ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तपास पथकातील पोलिसांना बातमीदारामार्फत संशयीत आरोपी पिंपळे निलख मधील विशाल नगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकातील सहा.पोलीस निरीक्षक सतिश कांबळे , पोलीस हवालदार चंद्रकांत भिसे , कैलास केंगले , पोलीस नाईक अरुण नरळे , शशिंकात देवकांत व पोलीस शिपाई हेमंतकुमार गुत्तीकोंडा यांनी शिवसागर हॉटेल, विशालनगर येथे सापळा रचून आरोपी १ ) समीर छोटे अली खान (वय २३ वर्षे,रा. साहिल हॉटेलजवळ संजय पार्क विमानगनगर पुणे . मुळ- फैजूल्ला खान , बिहार ) २ ) निहाल उर्फ फिरोज बरकत शेख (वय २८ वर्षे, संजय पार्क विमाननगर पुणे . मुळ- बेरीया, बिहार) यांना ताब्यात घेतले.
अधिक चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केले. तसेच चोरी केलेले सॅनेटरी साहित्य आरोपी रावसाहेब पंढरीनाथ सुर्यवंशी (रा . कचरेवाडी ता.तासगाव जि . सांगली) याला विक्री केले असल्याचे सांगितले. त्यानुसार आरोपी रावसाहेब पंढरीनाथ सुर्यवंशी यासही अटक करुन त्यांचे आणखी एका साथीदाराला अटक करण्यात आली. तसेच दाखल गुन्हयातील चोरीस गेलेले सॅनेटरी साहित्य व गुन्हयात वापरलेले वाहन असे एकुण १३,८८,००० / – रुपये किंमतीचे साहित्य व दोन छोटा हत्ती टेम्पो जप्त करण्यात आले.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ आनंद भोईटे , सहा . पोलीस आयुक्त वाकड विभाग श्रीकांत देसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी पोलीस ठाणे सुनिल टोणपे व तपास पथकातील सहा.पोलीस निरीक्षक सतिश कांबळे , पोलीस हवालदार चंद्रकांत भिसे , कैलास केंगले , सुरेश भोजणे , पोलीस नाईक अरुण नरळे , शशीकांत देवकांत , नितीन खोपकर , अनिल देवकर , प्रमोद गोडे , विवेक गायकवाड , प्रविण पाटील , विजय मोरे , सागर सुर्यवंशी , हेमंत हांगे व पोलीस शिपाई हेमंतकुमार गुत्तीकोंडा , शिमोन चांदेकर , सुहास डंगारे व परिमंडळ २ ऑफिसमधील नुतन कोंडे यांनी केली आहे .
Comments are closed