सांगवी, दि. २४( punetoday9news):- ह क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील कासारवाडी येथे कचरा संकलन केंद्रावरील कचराकुंडीत जैववैद्यकीय कचरा टाकलेचे सफाई कर्मचारी यांना आढळून आला होता . माहिती मिळाल्यानंतर मुख्य आरोग्य निरीक्षक महेश आढाव व आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी यांनी केलेल्या तपासाअंती आयुश्री क्लिनिक, थेरगाव येथील क्लिनिककडून सदर प्रकार घडल्याचे निदर्शनास आले.
ह क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागामार्फत संबंधितांवर 25000/- रुपये इतकी दंडात्मक कारवाई करणेत आली. सदर कारवाई ह क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात मुख्य आरोग्य निरीक्षक महेश आढाव आणि आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी यांचेमार्फत करणेत आली.
Comments are closed