दापोडी, दि. २५( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील जनता शिक्षण संस्थेच्या श्रीमती चन्द्रकला किशोरीलाल गोयल कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत घेण्यात २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने ऑनलाइन प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती .
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणिव निर्माण करणे व त्यांचा सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली. स्वावलंबन चारित्र्य संवर्धन व सामाजिक बांधिलकी या मुल्यांचा नवीन शिक्षण पद्धतीत समन्वय घडवून आणण्यासाठी महात्मा गांधींच्या जन्म शाताब्दी वर्षांपासून म्हणजे २४ सप्टेंबर १९६९ साली महाविद्यालयीन विध्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकारच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयांतर्गत राबविण्यात येत आहेत.
या योजनेला २४ सप्टेंबर २०२१ रोजी ५२ वर्ष पूर्ण होत आहेत . राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाच्या निमित्ताने शुक्रवार (दि.२४) ऑनलाइन प्रश्नमंजुषा उपक्रम श्रीमती सी. के .गोयल महाविद्यालय दापोडी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे संबंधित म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना, राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट, राष्ट्रीय सेवा योजनेचे नियमितकार्यक्रम, विशेष शिबिर कार्यक्रम, राष्ट्रीय सेवा योजना ब्रीद वाक्य, राष्ट्रीय सेवा योजना लोगो, यावर आधारित प्रश्न सामाविष्ट करुन 100 गुणांची ऑनलाइन प्रश्नमंजुषा घेण्यात आली. ही प्रश्नमंजुषा प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी होती. ५०टक्के गुण मिळाल्यानंतर ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात आले.
या प्रश्नमंजुषेला उत्तम प्रतिसाद मिळाला . ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमाचे आयोजन करण्यामध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, डॉ. सोमनाथ दडस, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, प्रा. अमरदीप गुरमे, प्रा. सिद्धार्थ कांबळे, प्रा. ज्योती लेकुळे, प्रा. दर्शन बागडे, श्री. कपिल कांबळे यांनी विशेष पुढाकार घेऊन उपक्रम यशस्वी केला.
Comments are closed