भोसरी,दि.२६( punetoday9news):-  नारायण हट सोसायटीची ५४वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २६ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली. कोवीड नियमांचे पालन करत ऑफलाईन आणि ऑनलाइन पद्धतीने सभा घेण्यात आली ‌.

सदर सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. संस्थेशी संबंधित दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. व त्यानंतर सभेला सुरुवात झाली. सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विचारविनिमयातून पार पडली. प्रत्येकाला आपली मुक्तपणे मते मांडण्याची संधी या सभेत प्राप्त झाली.
सभेमध्ये एकूण विषय पत्रिकेनुसार नुसार १२ विषयांवर चर्चा घडून आली. व निर्णय घेण्यात आले, विविध ठरावांना मान्यता घेण्यात आली, व ऐन वेळेच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी, संस्थेचे अध्यक्ष, डॉ.सुरेश पवार हे होते. संस्थेचे सचिव सतीश भालेकर यांनी प्रास्तविक व मागीलवर्षाची इतिवृतांत वाचन केले.
विषय पत्रिकेतील एकूण १२ विषयासंदर्भात संस्थेचे पदाधिकारी यांनी मते मांडली. सभासदांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. सभेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण विषयावर सखोल चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.
सभेसाठी संस्थेचे अध्यक्ष सुरेश पवार, सतीश भालेकर, कोषाध्यक्ष, संदीप बेंदूरे, सचिन तांबे, अनिल ताळे , संस्थेचे व्यवस्थापक अरुण ठोकळे याशिवाय ऑनलाईन काही पदाधिकारी उपस्थित होते.
सभासदांन मध्ये विचार विनिमया मध्ये सहभागी झाल्या मध्ये ज्येष्ठ सभासद ज्ञानेश्वर सावंत, मनोज पवार, डॉ. मंजुषा कदम, नीलम खेडकर, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, अंकुशराव गोरडे ,ज्ञानेश्वर चौधरी डॉ. रोहिदास आल्हाट, रोहिदास गैंद, संतोष बोरकर, डॉ.वसंतराव गावडे, नितीन राणे, व इतर सभासद आदींनी सभेमध्ये भाग घेतला.

आभार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश पवार यांनी मानले व वंदेमातरमने सभेची सांगता झाली.

 

Comments are closed

error: Content is protected !!