पिंपरी,दि.२७ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शिक्षक लोकशाही आघाडी आणि पिंपरी-चिंचवड माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक सर्वसाधारण सभा व द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टी डी एफ चे राज्याचे अध्यक्ष  विजय बहाळकर यांची निवड करण्यात आली. तर प्रमुख अतिथी यांनी निरीक्षक म्हणून टी डी एफ चे राज्य कार्याध्यक्ष जी के थोरात आणि टी डी एफ चे विभागीय सचिव के एस ढोमसे उपस्थित होते. याशिवाय पुणे जिल्हा माध्यमिक संघाचे अध्यक्ष वसंत ताकवले, जिल्हा कार्याध्यक्ष मुरलीधर मांजरे, पुणे जिल्हा पीडीएफ चे कार्याध्यक्ष तानाजी झेंडे ,पुणे जिल्हा पीडीएफ चे सचिव राजेंद्र पडवळ ,मंचर कॉलेजचे उपप्राचार्य चासकर सर व जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव दत्तात्रेय अरकडे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड शिक्षक लोकशाही आघाडी व पिंपरी-चिंचवड माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी निवृत्ती काळभोर यांची तर कार्याध्यक्षपदी महादेव फपाळ ,सचिवपदी संजय वाखारे आणि कोषाध्यक्षपदी रफीक इनामदार यांची एकमताने निवड करण्यात आली
तर पिंपरी चिंचवड शिक्षक लोकशाही आघाडीच्या अध्यक्षपदी राजेंद्र पितळीया यांची तर कार्याध्यक्षपदी रामनाथ खेडकर, सचिव पदी किरण आढागळे व कोषाध्यक्षपदी शशिकांत घुले यांची एकमताने निवड करण्यात आली

पाहुण्यांच्या मनोगतात जी के थोरात यांनी आज सर्व शिक्षकांनी एकत्रित येण्याची गरज बोलून दाखवली संघटन मजबूत झाले तरच आपले प्रश्न शासन दरबारी सुटू शकतात शिक्षकांनी आपल्या हितासाठी एकत्र येण्याची गरज आहे असे मत मांडले
तर के एस ढोमसे यांनी संघटना कशी असावी संघटनेची गरज काय आहे एकीच्या बळाचे महत्व काय असते इत्यादी बाबीकडे लक्ष वेधले आणि सर्वांनी एकमेकाच्या संपर्कात राहून संघटना मजबूत करण्याची गरज आहे असे मत मांडले
आजच्या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्यांची माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली असे नवनियुक्त अध्यक्ष निवृत्ती काळभोर यांनी संघटनेला मजबूत करण्या करिता सतत प्रयत्नशील राहील असा शब्द दिला आणि सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली व पीडीएफ च्या पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानले
अध्यक्षीय भाषणात विजय बहाळकर यांनी संघटनेच्या मागील काळातील कामाचे फलित आहे काय आहे याची माहिती दिली संघटनेत काम करणे म्हणजे सेवावृत्त आहे असे ती सांगायला ते विसरले नाहीत. हा सेवेचा वसा पुढे चालू ठेवण्याची गरज आहे असेही ते म्हणाले
तर शिक्षक लोकशाही आघाडीचे नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र पितळीया आणि संघटनेला उत्तम दिशा देण्यासाठी सर्वांच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली व कार्यक्रमाच्या मान्यवरांचे आभार मानले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव फपाळ यांनी केले.

 

Comments are closed

error: Content is protected !!