पिंपरी,दि.२८( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहर शिक्षक लोकशाही आघाडी ( टीडीएफ ) व माध्यमिक शिक्षक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच निगडी प्राधिकरण येथे पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष विजय बहाळकर, सचिव केरबा ढोमसे, कार्याध्यक्ष जी के थोरात यांनी पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर केली.
यात शहराध्यक्षपदी राजेंद्र पितलिया तर किरण अडागळे यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी टीडीएफचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी झेंडे, सचिव राजेंद्र पडवळ, जिल्हा माध्यमिक संघाचे कार्याध्यक्ष मुरलीधर मांजरे, सचिव दत्तात्रेय अरकडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शहर कार्यकारणी : उपाध्यक्ष – लहू सुतार, अरुणा सिलम, लक्ष्मण गुंजाळ, स्वप्नाली विचारे, मनीषा कलशेट्टी, अशोक शिंदे, अण्णासाहेब पाटोळे. सहसचिव – संजय बनसोडे, कपिल राऊतमारे. कार्याध्यक्ष – रामनाथ खेडकर. सहकार्याध्यक्ष – सूर्यकांत बनसोडे. कोषाध्यक्ष – सचिन नाडे. सहकोषाध्यक्ष – मारुती तोत्रे, श्रीधर आव्हाड. संघटक सदस्य – सच्चिदानंद खोत, गणेश ढगे, नरेंद्र बंड, रोहिदास पाखरे. महिला संघटक : रेखा लोखंडे, चेतना रमेश गाढवे, पूजा तानवडे, स्नेहा परांडे, जॉयसी पवार. सल्लागार – धोंडीराम हांडे, उमाकांत काळे, मधुकर गायकवाड. प्रसिद्धी प्रमुख – शशिकांत हुले. राज्य प्रतिनिधी – अशोक आवारी.
Comments are closed