पुणे, दि.२९( punetoday9news):- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या चिंचवड वसाहतीतील कायनेटीक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन लिमिटेड या इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीस भेट देवून वाहनांची माहिती घेतली.

यावेळी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, कंपनीचे अध्यक्ष पद्मश्री अरुण फिरोदिया, कार्यकारी संचालक अजिंक्य फिरोदिया, मुख्य कार्यकारी अधिकारी सुलेजा फिरोदिया आदी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन खर्च, वाहनाचा दर्जा, बॅटरी क्षमता, उत्पादन कालावधी, चार्जिंग कालावधी आदी माहिती जाणून घेतली. ते म्हणाले, इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीस शासन प्रोत्साहन देत असून भविष्यात इलेक्ट्रिक वाहन वापरण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

पर्यावरण मंत्री ठाकरे यांच्या हस्ते कंपनी आवरात वृक्षारोपण करण्यात आले.

 

Comments are closed

error: Content is protected !!