पिंपळे गुरव,दि. २ ( punetoday9news):-  पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शामभाऊ जगताप युवा मंचच्या वतिने ज्येष्ठ नागरिक सन्मान व मोफत उपक्रम सोहळा आयोजित करण्यात आला. यास परिसरातील जेष्ठ नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला .


ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, की शामभाऊ जगताप यांनी आयोजित केलेला कार्यक्रम वाखाणण्याजोगा आहे. ते नेहमीच ज्येष्ठ नागरिक असो, की सर्वसामान्य नागरिक सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात. ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यास ते नेहमीच प्राधान्य देत आले आहेत. त्यामुळे शामभाऊ जगताप यांनी कधीही आम्हाला हाक देवो, त्यांच्या हाकेला तात्काळ धावून जाऊ. आमचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी असणार आहे.

शामभाऊ जगताप यांनी सांगितले, की आपली सामाजिक जबाबदारी म्हणून विविध उपक्रम राबविण्यात आले. आपण कायमच वडीलधाऱ्या नागरिकांच्या समस्या, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. ज्येष्ठांचे आशीर्वाद हेच जगात सर्वोत्कृष्ट असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, हे माझे भाग्य आहे.

यावेळी उपस्थीत मान्यवर राष्ट्रवादी कॅाग्रेस पिंपरी चिंचवड शहराचे शहरअध्यक्ष संजोग वाघेरे पाटील , विरोधी पक्षनेते नगरसेवक नाना काटे ,नगरसेवक मयुर कलाटे , प्रशांत शितोळे ,राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, युवक अध्यक्ष संदीपलाला चिंचवडे, शोभाताई अदियाल , सुषमा तनपुरे, संदेशकुमार नवले, उज्वला ढोरे, आश्विनीताई शामभाऊ जगताप, तृप्तीताई जवळकर,अरुण पवार, विष्णु शेळके ,अमर अदियाल, तानाजी जवळकर, शिवाजी पाडुळे, कामगार नेते हनुमंत जगताप, गणेश बॅंकेचे मा. संचालक गणेश करंजकर,रघुनाथ डोळस, राजेंद्र कांबळे, अमृता ढाणे, युवती अध्यक्षा संजीवनी पुराणिक, हिना टांक, जयवंत देवकर, मारुती जांभुळकर ,मधुकर नवले, विलासतात्या जगताप, शंकरतात्या जगताप , मधुकर रणपिसे , सोपान जांभुळकर , वसंत चव्हाण, बाळासाहेब काशीद , किसन जगताप ,नितीन रामचंद्र कदम, पै गणेश काशिद , अतुल काशिद , अशोक जगताप ,नरेश जगताप ,राघुजी जगताप , जनार्दन जगताप, रोहीदास जगताप, गणेश काशिद, सुमित जगताप, कमलेश जगताप, पै गणेश जगताप , आदेश जगताप , गणेश (भाऊशा )जगताप, नितीन पप्पु काशिद , गणेश फुगे व पिंपळे गुरव ग्रामस्थ, भैरवनाथ ज्येष्ठ नागिरक संघटना ,संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागिरक संघटना ,जय गणेश ज्येष्ठ नागिरक संघटना ,जय मल्हार ज्येष्ठ नागिरक संघटना ,अनंत ज्येष्ठ नागिरक संघटना ,पितामह भिष्माचार्य ज्येष्ठ नागिरक संघटना ,भैरवनाथ भजनी मंडळ ज्येष्ठ नागिरक संघटना ,सहाद्री आदिवासी ज्येष्ठ नागिरक संघटना व पिं.चिं. शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे सर्व पदधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित कातळे व आभार तानाजी जवळकर यांनी मानले.

Comments are closed

error: Content is protected !!