चिखली घरकुल योजनेचे पुनःसर्वेक्षण

अजुनही १२४२ सदनिकांपैकी ७२१ सदनिका बंद तर ८३ सदनिकांमध्ये भाडेकरू असल्याचे धक्कादायक सत्य समोर.

 

पिंपरी,२( punetoday9news):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिखली येथे विकसित करण्यात आलेल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या घरकूल योजनेतील यापूर्वी बंद आढळलेल्या १२४२ सदनिकांचे पुन्हा सर्वेक्षण आज करण्यात आले असून त्यामध्ये ७२१ सदनिका बंद तर ८३ सदनिकांमध्ये भाडेकरू आढळून आल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या पथकाला बंद सदनिकांची पुन्हा तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप यांच्यासह वीस कर्मचारी यांनी ही पुन्हा तपासणी केली.
यापूर्वी ४ सप्टेंबर रोजी सर्व सदनिकांची तपासणी केली होती.त्यामध्ये १२४२ सदनिका बंद आढळून आल्या होत्या.त्याची तपासणी आज केली त्यामध्ये ७२१ सदनिका पुन्हा बंद तर ८३ सदनिकांमध्ये भाडेकरू राहत असल्याचे आढळून आले.४३८ सदनिकांमध्ये सदनिकाधारक स्वता राहत असल्याचे आढळून आल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

या योजनेतील लाभार्थ्यांना १० वर्षापर्यंत सदनिका भाड्याने देतां येत नाही.तसेच विक्री करता येत नाही .लाभधारकांच्या समवेत झालेल्या करारनाम्यात या सदनिकांचा वापर स्वता राहण्यासाठी करावयाचा असल्याचे नमूद आहे.या अटींचे उल्लंघन करणाऱ्यांचा लाभ रद्द करण्याची तरतूद असून त्याबाबत संबंधितांना नोटीस देण्याचे निर्देश झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांना दिल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!