मुंबई,दि.३( punetoday9news):- हिंदी व मराठी अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे . त्यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेवर चित्रपट करत असल्याचे जाहीर केले आहे .मात्र यावर जितेंद्र आव्हाड भडकले असून त्यांनी ट्विटर द्वारे कोण महेश मांजरेकर असा प्रश्न केला आहे. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या कात्रीत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.
महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीच्या मुहूर्तावर महेश मांजरेकर यांनी ट्वीटर आणि इंस्टाग्राम वर सिनेमाचा टीझर शेअर केला आहे .
महेश मांजरेकरांच्या या नव्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
Comments are closed