पिंपळे गुरव, दि. ४( punetoday9news):- आंतरराष्ट्रीय मानवअधिकार राजदूत संघटना, ग्लोबल पीस कौन्सिल, भारतीय महाक्रांती सेना यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्ता मार्गदर्शक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


पिंपळे सौदागर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पोलिस अधिकाऱ्यांचा कोविड योध्दा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान नगरसेवक नाना काटे, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, भोसरी पोलिस ठाण्याचे उमेश देवकर, अजय उगळे, सामाजिक कार्यकर्ते आशितोष नखाते, संघटनेचे अध्यक्ष कैलास पठारे, उपाध्यक्ष प्रवीण पठारे, पुणे जिल्हा अध्यक्ष संग्राम तळेकर, जनसंपर्क अधिकारी संतोष माने, सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed

error: Content is protected !!