पिंपरी,दि. 9 ( punetoday9news):- श्री अग्रसेन महराज जयंती निमित्त अग्रवाल समाज फेडरेशन पुणे यांच्या वतीने पर्यावरणाचे संरक्षण, इंधन बचत आणि आरोग्याचा संदेश, देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .
सकाळी 5.30 वाजता प्राधिकरण येथील अग्रसेन गार्डन येथील अग्रेसन महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष विनोद बंन्सल, सचिव के. एल. बंसल, सुधिर अग्रवाल, संजीव अग्रवाल, नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ, शैलेजा मोरे, शर्मिला बाबर आदीं उपस्थित होते.
सदर रॅली प्राधिकरण ते दगडूशेठ हलवाई मंदीर ते सारसबाग येथील महालक्ष्मी मंदीरात पोहचली. महालक्ष्मी मंदीरात सदर सायकल रॅलीचे स्वागत अग्रवाल समाज फेडरेशन पुणे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले. सर्व सहभागी सायकलपट्टूं सोबत महालक्ष्मी मंदीरात आरती करण्यात आली.
ही सायकल रॅली येथून पुन्हा बोपोडी येथून चिंचवड येथील अग्रसेन भवन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.सदर रॅलीचे बोपोडी, चिंचवड आदी ठिकाणी स्थानिक समाजाच्या प्रतिनिधीनी स्वागत केले.
या रॅली मध्ये सहभागी सर्वांनाचे मेडल देवून सन्मान करण्यात आले.
श्री अग्रसेन जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचे उद्घाटन पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे आणि कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भीमसेन अग्रवाल, प्रेमचंद मित्तल,सुनील जयकुमार, अनिल मित्तल, निता अग्रवाल आदी उपस्थित होते.
Comments are closed