जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं . म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती , त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते . ‘ ही माहिती सातबारा , फेरफार , खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे . आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे . याआधी ही सुविधा फक्त 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित होती .

आता मात्र राज्यभरातल्या 19 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा पुरवली जात आहे . यामध्ये अहमदनगर , अकोला , अमरावती , औरंगाबाद , चंद्रपूर , धुळे , गडचिरोली , गोंदिया , जळगाव , लातूर , मुंबई उपनगर , नंदूरबार , नाशिक , पालघर , रायगड , सिंधुदुर्ग , ठाणे , वाशिम , यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे .

ई – अभिलेख या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे . पण , हे उतारे कसे पाहायचे याचीच माहिती आपण आता पाहणार आहोत . जुने अभिलेख कसे पाहायचे ? जुने अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला aapleabhilekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल . त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल . e – Records ( Archived Documents ) या नावाचं एक पेज तुम्हाला दिसेल .

या पेजवर उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता . तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल , तर लॉग – इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता . पण , जर तुम्ही पहिल्यांदाच इथं आला असेल , तर सगळ्यात अगोदर तुम्हाला इथं नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे . एकदा का तुम्ही इथं क्लिक केलं की एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल . यामध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती द्यायची आहे . यामध्ये तुमचं नाव , मधलं नाव आणि आडनाव . त्यानंतर जेंडर ( मेल आहे की फिमेल ) , नॅशनलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व , त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे .

त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता ते सांगायचं आहे , जसं की business , service कि other म्हणजेच यापैकी वेगळं काही करता ते सांगायचं आहे . यानंतर मेल आयडी आणि जन्मतारीख लिहायची आहे . वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर पत्त्याविषयीची माहिती सांगायची आहे .  त्यानंतर Pincode टाकायचा आहे . पिन कोड टाकला की जिल्हा आणि राज्याचं नाव आपोआप फॉर्मवर येऊन जातं . पुढे गल्लीचं नाव , गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव टाकायचं आहे . ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन आयडी तयार करायचा आहे . व लाॅगइन करायचे आहे

आता आपण सुरुवातीला फेरफार उतारा कसा पाहायचा ते बघूया.

यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे . पुढे तालुका , गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे . यात तुम्हाला कोणता उतारा हवा आहे तो निवडायचा आहे . आता मी फेरफार उतारा निवडला आहे . जर तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा , आठ – अ हवा असेल तर आठ – अ पर्याय निवडायचा आहे . असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत . त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध या पर्यायावर क्लिक करायचं आहे . त्यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते . फेरफाराचं वर्षं आणि क्रमांक तिथं दिलेला असतो . तुम्ही त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता .

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!