सांगवी, दि.१०(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी मधील प्रतिक मधुकर पवार याने महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या चॅम्पियनशिपमध्ये ‘बेंचप्रेस’ प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.
०८ ते १० ऑक्टोबर दरम्यान औरंगाबाद येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यातील अनेक जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. प्रतिकने १२० किलो वजनी गटात ‘बेंच प्रेस’ प्रकारात १५० किलो वजन उचलून सुवर्णविक्रम केला.त्याच्या या कामगिरीसाठी सांगवी-पिंपळे गुरव परिसरातील सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे, तसेच अभिनंदनासोबत पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या जात आहेत. प्रतिक हा यापूर्वी पॉवर वेटलिफ्टिंगमध्ये आशियाई विजेता आहे. जागतिक पॉवर लिफ्टिंगमध्ये भाग घेऊन त्याने देशासाठी पदक जिंकणचा मानस आहे .
यापूर्वी ही प्रतीक पवार ने स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल आणि आशिया स्पर्धेत उत्तम अशी कामगिरी करुन अनेक सुवर्ण पदक मिळविली आहेत. यापूर्वी ही पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक वाढविल्यामुळे त्याचा आमदार लक्ष्मण जगताप आणि महापौर माई ढोरे यांनीही गौरव केला होता.
आपल्या कामगिरी बद्दल प्रतिक म्हणाला ”माझ्या वडिलांचे मार्गदर्शन जीवनात नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. आजही मी दररोज पिंपळे गुरव येथील ‘2N स्पोर्ट फिटनेस जिम मध्ये दररोज सराव करत आहे, तेथील कोच मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. तसेच शिवाजीनगर मधील पोलिस ग्राउंड शेजारी खासगी प्रशिक्षण चालू आहे. भविष्यात पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक जगाच्या नकाशावर वाढविण्यासाठी माझा प्रयत्न राहील. ”
Comments are closed