पिंपरी,दि.१३( punetoday9news):- माळी महासंघ पिंपरी चिंचवड शहर शिक्षक आघाडी पदाधिकारी नियुक्ति पत्र प्रदान कार्यक्रम घेण्यात आला. 

सामाजिक जीवन जगत असताना पिढी घडवण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. विद्यार्थ्यांसाठी शिक्षक दीपस्तंभाचे कार्य करत असतात. चुकलेल्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्यदेखील शिक्षक करत असतात, सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी शिक्षकांचे योगदान मोलाचे आहे. ज्या विषयाला हात घालावयाचा त्या विषयाची उंची वाढवायची अशा गुणी शिक्षकांची समाजाला गरज असल्याचे मत माळी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काळूराम गायकवाड यांनी व्यक्त केले.

माळी महासंघ पिंपरी चिंचवड शहर शिक्षक आघाडी पदाधिकारी यांना नियुक्ति पत्र प्रदान कार्यक्रमात गायकवाड बोलत होते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हिरामण भुजबळ ,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गव्हाणे, महासचिव चंद्रकांत वाघोले, पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष गोविंद आल्हाट, उपाध्यक्ष दिलीप बनकर, कोषाध्यक्ष नवनाथ बोराटे आदी उपस्थित होते.

माळी महासंघ शिक्षक आघाडी-पिंपरी -चिंचवड शहर पुढील प्रमाणे :- 
अध्यक्ष- राजकुमार माळी,

उपाध्यक्ष-.बळीराम माळी,

उपाध्यक्ष- सुरेश राऊत,

महासचिव- बिपीन बनकर,

कोषाध्यक्ष- गणेश राऊत,

सहकोषाध्यक्ष- संगिता लडकत,

सचिव- हरीश शिंदे,

सचिव- किर्ती मोटे – धनवटे,

सचिव- सागर झगडे,

सहसचिव- लक्ष्मण रासकर,

सदस्य- सोनाली वाघमारे.

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!