पिंपरी,दि.१३( punetoday9news):- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे महाराष्ट्र राज्य कानडे समाज गौरव समिती आयोजित गुणवंत विद्यार्थी , आदर्श शेतकरी , शिक्षक , उच्च गुणवत्ताधारक यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता . त्यावेळी जनता शिक्षक संस्थेच्या सहसचिव पदावर निवडून आल्याबद्दल हेमंत बगनर यांचा महाराष्ट्र राज्य कानडे समाज गौरव समिती तर्फे सत्कार करण्यात आला.

अध्यक्षस्थानी कोंडाजी ढोन्नर होते . यावेळी अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त दीपक महाराज देशमुख , रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य , माजी अध्यक्ष सचिन देशमुख , प्रा . पराग सद्गीर , गणेश करवर , डी . के . बिन्नर , विठ्ठल बेणके , माजी उपसभापती मारूती बिन्नर , अशोक चंदगीर , लक्ष्मण बोगीर , बबनराव सदगीर , ठकाजी लांडगे , गौरव समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ चोखंडे , मधूकर बिन्नर , गंगाराम करवर , राजेंद्र सदगीर , प्रा . मधूकर मोखरे , एकनाथ जोरवर , ॲड . रमेश जोरवर , नरेश खाडगीर , सुभाष बगनर , रामभाऊ बेणके , पंढरीनाथ चावडे , काशिनाथ करवर , भगवान जोरवर , प्रशांत बगनर , लक्ष्मण बेणके , संतोष सदगीर , बाळासाहेब बेणके , रोहिदास ढोन्नर , बाळासाहेब सदगीर , अवधूत खाडगीर , हेमंत बगनर , बुवाजी बेणके , बबन बिन्नर , सुनिल बेणके , कचरू बेणके उपस्थित होते .

प्रा . पराग सदगीर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत कोठेही कमी पडत नसल्याचे सांगितले . राजेंद्र सदगीर महाराज यांनी शिक्षणाला अध्यात्माची जोड देऊन चांगले कर्म करा व आपले जीवन घडवा , असे सांगितले . यावेळी औरंगाबाद येथील करियर काऊन्सलर संतोष कार्ले यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या करियरची सुरूवात कशी करावी , १० वी , १२ वी नंतर पुढे काय ? शिक्षणाच्या , नोकरीच्या वाटा कशा आहेत, याविषयी मार्गदर्शन केले .

सूत्रसंचालन पोपट ढोन्नर व सुभाष बगणर यांनी केले . प्रारंभी सखाराम डोके यांचा संगीत कार्यक्रम पार पडला .

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!