पिंपरी,दि.१४( punetoday9news):-  शहरातील ऋग्वेदा सागर विरकर या अवघ्या ४ वर्षे वयाच्या मुलीची  इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झाल्याबद्दल महापौर माई ढोरे यांच्या हस्ते तीचा सत्कार करण्यात आला. 

तिने मानवी शरीर रचना, विज्ञान, यामध्ये सांगाडा प्रणाली, मानवी शरीरातील हाडांची नावे, पचनसंस्था व त्यांच्या ग्रंथी उत्सर्जन संस्था, श्वसन प्रणाली, मज्जासंस्था आणि मानवी दातांचे प्रकार सांगून अनोखा विक्रम प्रस्थापित केला.

यावेळी महापौर कक्षात झालेल्या सत्कारास माजी महापौर नितीन आप्पा काळजे, उप आयुक्त संदीप खोत, ऋग्वेदाचे वडील सागर विरकर, आई तृप्ती विरकर उपस्थित होते.

Comments are closed

error: Content is protected !!