पिंपरी,दि.१४( punetoday9news):- विविध क्षेत्रामध्ये आज महीलांनी आपल्या कर्तृत्वाने मोठी भरारी मारलेली आहे. भविष्यात पिंपरी चिंचवड बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी एक दिवस महिला अध्यक्ष होईल, असे मत नारी शक्तीचा सन्मान करताना महापौर माई ढोरे यांनी व्यक्त केले.
मोरवाडी येथील पिंपरी न्यायालय येथे पिंपरी चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने सन्मान नारी शक्तीचा हा कार्यक्रम राबविणेत आला, त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणुन महापौर माई ढोरे बोलत होत्या. या कार्यक्रमात वकिली करत असताना सामाजिक क्षेत्रात देखील मोलाचे कार्य करीत असलेल्या ॲड. सारिका परदेशी व ॲड. तारा नायर यांचा सत्कार महापौर माई ढोरे याच्या हस्ते करण्यात आला. पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गोरखनाथ झोळ व बारच्या महिला सचिव ॲड. मोनिका गाढवे यांनी महापौर माई ढोरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे सदस्य धनंजय कोकणे, ऋतुराज आल्हाट, जयश्री कुटे, मेरी रणपीसे, पल्लवी विघ्ने, सुषमा बोरसे, विद्यालता कमलाकर, पुनम शर्मा, फजल वायकर, स्नेहा कांबळे, प्रियंका अडागळे, राधा जाधव, पुनम राऊत, संतोषी काळभोर, ऐश्वर्या धुमाळ, सुदाम साने, प्रताप साबळे, अतुल कांबळे, गणेश शिंदे, सी.एम. माने, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, महिला आपले घरदार सांभाळून विविध क्षेत्रामध्ये कार्य करित आहेत. विविध देशांमध्ये तसेच भारतातही महिला आपल्या कर्तृत्वाने मोठी पदे मिळवित आहेत, ही महिलांसाठी अभिमानाची गोष्ट आहे असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अनिल शिंदे यांनी केले. आभार व स्वागत ॲड. महेश टेमगिरे यांनी केले.
Comments are closed