पिंपरी दि.१७( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरात ऑनलाइन ॲपच्या साहाय्याने शेअर मार्केटमधील निर्देशांकाच्या चढउताराचा बेकायदेशीर वापर करत ‘ डब्बा ट्रेडिंग ‘ करणाऱ्या पिंपरी – चिंचवड मधील तीन ठिकाणांवर दरोडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी छापा मारून तेरा जणांना अटक करण्यात आली.

त्यांच्याकडून सुमारे सव्वा लाख रुपये आणि १५ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत .वासू खुशालदास बालाणी ( वय ५१ , रा . वाघेरे पार्क , पिंपरी ) , प्रकाश पासमल मनसुखानी ( वय ५२ , रा . शास्त्रीनगर , पिंपरी ) , रवी अच्युत गायकवाड ( वय ३५ , रा . गांधीनगर , पिंपरी ) , विकी सुरेश कांबळे ( वय ३६ , रा . बलदेवनगर , पिंपरी ) , रोशन सुरेश मखिजा ( वय २ ९ , रा . वैष्णोदेवी मंदिराजवळ , पिंपरी ) , सतिश दत्तात्रय खेडकर ( वय ३५ , रा . गव्हाणे वस्ती , भोसरी ) , राहुल मारुती कांबळे ( वय ४८ , रा . शास्त्रीनगर , पिंपरी ) , रितेश अरुण गायकवाड ( वय ३२ , रा . घोरपडी स्टेशन रोड , शनिवार पेठ , पुणे ) , राजकुमार आवतराम कुंदनानी ( वय ४५ रा . शगुन चौक , पिंपरी ) , गोविंद मोहनदास नथवानी ( वय ५२ , रा . वैष्णोदेवी मंदिराजवळ , पिंपरी ) , हरेश सेवकराम सचदेव ( वय ३१ , रा . साईनाथ सोसायटी , पिंपरी ) , जितू सुरेश मखिजा ( वय ३१ , रा . पिंपरी ) आणि जितू शंकर वलेचा ( वय २४ , रा . लक्ष्मीधर्म शाळेजवळ , पिंपरी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत .

या सर्वांवर सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे . शेअर मार्केटमध्ये ‘ डब्बा ट्रेडिंग ‘ हा अवैध ट्रेडिंगचा प्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना माहिती मिळाली होती . त्या अनुषंगाने त्यांनी दरोडा विरोधी पथकाला कारवाईचे आदेश दिले . त्यानुसार , पथक तयार करण्यात आले . पिंपरीतील ॲपल बिल्डर ॲण्ड डेव्हलपर्स , अशोक थीएटरजवळील शेअरखान आणि गॅलड चौकातील बालाजी इनव्हेस्टमेंट या कार्यालयांवर एकाच वेळी छापा टाकण्यात आला . या कारवाईत एक लाख २० हजारांची रोकड आणि १५ मोबाइल जप्त करण्यात आले . आरोपींनी ऑनलाइन ॲपच्या सहाय्याने शेअर मार्केट मधील निर्देशांकाच्या चढउताराचा विनापरवाना वापर केला . त्याआधारे बेकायदेशीरपणे ट्रेडिंग केले . त्यासाठी कोणत्याही ‘ डी मॅट ‘ अकाऊंटचा वापर केला नाही . स्वत : ची ओळख लपवून त्याबाबत ‘ सेबी’ला कोणतीही नोंदणी न करता कर चुकवेगिरी करत सरकारची फसवणूक केली , असे उघड झाले आहे .

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!