पुणे ( punetoday9mews) :- पुणे शहरात  कोजागिरी पौर्णिमेसाठी गणेश पेठेतील घाऊक दूध बाजारात दुधाची मोठी आवक झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मागणी वाढली असून दूध बाजारात एक लिटर दुधाला ६५ ते ७० रुपये लिटर असा भाव मिळाला आहे .

कोजागिरी पौर्णिमा मंगळवारी (१९ ऑक्टोबर) आहे. शीतल चांदण्यात आटीव दुधाचा आस्वाद घेऊन कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. शहरातील गणेश पेठेत मुख्य दूध बाजार (दूधभट्टी) आहे. शहरातील मिठाई विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच केटरिंग व्यावसायिक दूध बाजारातून खरेदी करतात. गेल्या वर्षी करोनाच्या संसर्गामुळे सार्वजनिक स्वरूपात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली नव्हती.

त्यामुळे गेल्या वर्षी दुधाला प्रतिलिटर ५० रुपये लिटर असा भाव मिळाला होता. यंदाच्या वर्षी निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे यंदा दुधाला मागणी वाढली असून सार्वजनिक मंडळांकडून दुधाला चांगली मागणी आहे, अशी माहिती गणेश पेठ दूध बाजार खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रामदास काळे आणि उपाध्यक्ष दामोदर तथा तात्यासाहेब हिंगमिरे यांनी दिली.

Comments are closed

error: Content is protected !!