पिंपरी,दि.१९( punetoday9news):-  मरकळ, तुळापूर ग्रामस्थ, मराठवाडा जनविकास संघ व शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी वृक्षारोपण करण्यात आले.


मरकळ व तुळापूर गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी, तसेच मराठवाडा जनविकास संघ(महा.राज्य) मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिंपळे गुरव,पिंपरी-चिंचवड व शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, कडूलिंब, आवळा, तुती आदी रोपांची लागवड करण्यात आली. त्यांचे संगोपन रोपे स्वयंभू होईपर्यंत त्यांचे संगोपन मराठवाडा जनविकास संघाकडून केले जाणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष व वृक्षमित्र अरुण पवार यांनी सांगितले.


यावेळी सरपंच भानुदास लोखंडे, उपसरपंच संतोष भुसे, नवनाथ लोखंडे, तुळापूर ग्रामस्थ सुखदेव शिवले राजाराम लोखंडे, उत्तम लोखंडे, महेंद्र लोखंडे, वृक्षमित्र अरुण पवार, आशिष पवार, सामाजिक कार्यकर्ते सागर लोखंडे, अभिषेक पवार, हरिश्चंद्र काळे आदी मान्यवर उपस्थित होत्ते.
मराठवाडा जनविकास संघ(महा.राज्य) संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती, पिंपरी-चिंचवड यांच्यावतीने गेल्या नऊ वर्षापासून वृक्षारोपण करून संगोपन करण्यात येते. दरवर्षी कमीत कमी एक हजार वृक्षाची जाळीसह लागवड व संगोपन करण्यात येते. वृक्षांना गरजेनुसार टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करण्यात येतो. संघाच्या वतीने २०१२ पासून आठवड्याच्या दर रविवारी वृक्ष संवर्धन, पाणीपुरवठा, स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबिवले जातात. उस्मानाबाद जिल्यातील धारूर, चिंचोली, बिंजनवाडी सोनारी गाव, निजाम, जावळ येथे वृक्षांची जाळीसह लागवड करण्यात आली. तसेच पुणे येथे पिंपळे गुरव, मरकळ गाव, श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे वृक्षांची पर्यावरण संतुलन राखण्याच्या उद्देशाने वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!