पुरंदर, दि. २०( punetoday9news):- पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावात शरद पवार सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचे औचित्य साधून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मा. अध्यक्ष व विद्यमान संचालक प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

शिबिरातील लाभार्थ्यांपैकी पहिल्या टप्प्यातील ४२ रुग्णांना आज पुणे येथील बुधरानी हॉस्पिटल येथे विविध प्रकारच्या नेत्र शस्त्रक्रियांसाठी पाठवण्यात आले.

यावेळी वाल्हे गावचे सरपंच अमोल काका खवले, मा.उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुरंदर तालुका अध्यक्ष संदेशदादा पवार, ग्रामपंचायत सदस्या चित्राताई जाधव, अभी दुर्गाडे, पवण दुर्गाडे, विठ्ठल पवार, मनोज घाटे, अमित झेंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!