पिंपरी , २०( punetoday9news):-  आपल्या कर्तुत्वाने पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकामध्ये भर घालणा-या माधुरी गरुड , ऋतुराज गायकवाड , ह.भ.प. सतीश महाराज काळजे , प्रसाद पाटील यांचा सत्कार महापालिका सभेमध्ये महापौर माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते शाल , स्मृतीचिन्ह व पुस्तक भेट देऊन करण्यात आला .

यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले , सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके , विरोधी पक्षनेते राजू मिसाळ , शिवसेना गटनेते राहुल कलाटे , मनसे गटनेते सचिन चिखले , ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर , नगरसदस्य नवनाथ जगताप , नगरसदस्या सिमा चौगुले , माधवी राजापुरे , अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे , नगरसचिव उल्हास जगताप , सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते .

माधुरी गरुड यांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC परीक्षेमध्ये ५६१ रॅक मिळविलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील उत्तीर्ण झालेल्या एकमेव व्यक्ती म्हणून सत्कार करण्यात आला . आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या शहरातील नागरिक व उदोयन्मुख खेळाडू ऋतुराज गायकवाड यांचा सत्कार त्याच्या आई व वडिलांनी स्विकारला . अध्यात्मिक क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल , ह.भ.प. सतीश महाराज काळजे यांचा सत्कार करण्यात आला.

 

Comments are closed

error: Content is protected !!