शिरूर,दि. २१ : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे पिंपरखेड येथे ‘ बँक ऑफ महाराष्ट्र ‘ या बँकेवर दिवसा दरोडा टाकण्यात आला आहे . दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून बँकेतील जवळपास २ कोटी रुपये किमतीचे सोने आणि ३० ते ३५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून पळ काढला आहे.
दुपारच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील पाच ते सहा इसम अचानकपणे शस्त्रांसह बँकेत घुसले . बँकेतील अधिकाऱ्यांवर पिस्तुल रोखत या दरोडेखोरांनी काही क्षणांतच सर्व ऐवज लुटला . भरदुपारी घडलेल्या घटनेने जिल्ह्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे .
बँक दरोड्यातील आरोपी नगरच्या दिशेला पळून गेल्याची माहिती समोर येत आहे . या पार्श्वभूमीवर शिंगवे , पारगाव , रांजणी , वळती , भागडी , थोरांदळे व इतर गावातील पोलीस पाटील यांनी सदरचा मेसेज आपापल्या गावांमध्ये इतर ग्रुपमध्ये प्रसारित करावा आणि अशी गाडी व संशयित व्यक्ती आढळून व आल्यास तात्काळ मंचर पोलीस स्टेशनला कळवावे , अशा सूचना देण्यात आल्या आहेत . या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे .
Comments are closed