पुणे, दि. 22( punetoday9news):-  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेची तारीख पुन्हा बदलण्यात आली आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी होणार होती. परंतु 20 ऑक्टोबर रोजी परिषदेने टीईटी परीक्षेची सुधारित तारीख असलेले परिपत्रक संकेतस्थळावर टाकले आहे.

येत्या 30 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार होती. मात्र, त्याच दिवशी देगलूर, बिलोली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. हे विचारात घेऊन परीक्षेच्या दिनांकात पुन्हा बदल करण्यात आला असून, आता सुधारित वेळापत्रकानुसार ही परीक्षा 30 ऑक्टोबर 2021 ऐवजी 21 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

त्यानुसार प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याचा दिनांक 26 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर असा असणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I हा 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 ते 1.00 या वेळेत होणार आहे; तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II हा 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.00 ते 4.30 या वेळेत होणार आहे. याबाबतचे परिपत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!