पुणे, दि.२ – जिल्ह्यातील काही व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘पुणे कलेक्टरकडून सूचना’ या शीर्षकाखाली लॉकडाऊनबाबत सूचना देणारा संदेश फॉरवर्ड करण्यात येत आहे. या संदेशात वृत्तपत्र बंद करा, शेजाऱ्यांशी संवाद बंद, बेकरी सामान बंद आदी दिशाभूल करणाऱ्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.
असा कोणताही संदेश पुणे जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. हा संदेश नागरिकांमध्ये गैरसमज पसरविणारा असून नागरिकांनी असा संदेश कोणालाही फॉरवर्ड करू नये. कोणी फॉरवर्ड करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. प्रशासनाने दिलेल्या अधिकृत सूचना जिल्हा माहिती कार्यालयाच्या ट्विटर हँडल @Info_Pune वर वेळोवेळी देण्यात येतात, तसेच वृत्तपत्रांमधून प्रकाशित करण्यासाठी पाठविण्यात येतात, असे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी कळविले आहे.
तरी नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या मेसेज वर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहिती वरच विश्वास ठेवून खात्री केल्याशिवाय कसलेही मेसेज पुढे फाॅरवर्ड करू नयेत.
Comments are closed