मुंबई, दि. २२( punetoday9news):- राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह (LOGO) ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असून, आकर्षक, कल्पक आणि रचनात्मक बोधचिन्ह 31 ऑक्टोबर 2021 पूर्वी isumharashtra@gmail.com
ऑगस्ट 2021 महिन्यात बोधचिन्ह स्पर्धा घेण्यात आली होती. योग्य प्रवेशिका प्राप्त न झाल्याने सदर स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. नव्याने बोधचिन्ह (LOGO) तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. नव्याने आयोजित स्पर्धेमध्ये या पूर्वी झालेल्या स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक देखील सहभागी होऊ शकतात.
अल्प व मध्यम मुदतीचे अभ्यासक्रम सुरु करून उत्तम क्रीडा मार्गदर्शक तयार करणे, क्रीडा क्षेत्रात कुशल मनुष्यबळ, विज्ञान व तंत्रज्ञान यामाध्यमातून क्रीडा क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी विविध अभ्यासक्रम “आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ’’ महाराष्ट्र शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी पुणे येथे सुरु करण्यात आले आहे.या स्पर्धेच्या सहभागाच्या दृष्टीने नियम व अटी साठी शासनाच्या http://sports.maharashtra.gov.
निवड समितीच्या शिफारशीनुसार प्रथम क्रमांकाचे बोधचिन्ह LOGO) सादर करणा-या प्रवेशिकेस रु. १,००,०००/- (रुपये एक लक्ष मात्र) इतके रोख पारितोषिक प्रदान करण्यात येईल. बोधचिन्ह (LOGO) स्विकारणे अथवा कोणतेही कारण न देता नाकारणे याबाबतचे सर्व अधिकार आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांना राहतील. बोधचिन्ह (LOGO) पाठवताना कोरल ड्रॉ, Psf, JPEG स्वरुपात पाठवावे, बोधचिन्हावर कोणत्याही प्रकारे नांव, क्रमांक किंवा ओळख दिसून येईल अशा कोणत्याही बाबी न%A
Comments are closed