पिंपरी, दि.२३( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात महागाई जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक ॲड. सचिन भोसले शिवसेना शहर प्रमुख यांनी दिली आहे. 

शहर शिवसेनेच्या वतीने हा मोर्चा दि. २५ रोजी सकाळी १०.३० वा. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर चौक , पिंपरी येथून सुरू होऊन भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत असणार आहे. यावेळी शहरातील शिवसेनेचे आजी – माजी पदाधिकारी व महिला आघाडी , युवासेना , शिवसेना अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


Comments are closed

error: Content is protected !!