पुणे,दि. २४( punetoday9news):- गेली तेवीस वर्षे चित्रपट, तसेच नाटक आणि जाहिरात क्षेत्रात मेकअप आर्टीस्ट म्हणून कार्यरत असलेल्या अविनाश कोरे यांना पुण्यातील आर्ट बिटस् फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा ‘महाराष्ट्र कला सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. अविनाश कोरे यांना ‘रंगभूषा’ या कला विभागात हा पुरस्कार मिळाला आहे. आर्ट बिटस् फौंडेशनकडून हा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात येणार आहे. 
        मेकअप आर्टीस्ट अविनाश कोरे हे गरजू नवोदित कलाकारांना ही कला शिकवतात. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
        या पुरस्काराविषयी माहिती देताना आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक संचालक संतोष पांचाळ यांनी सांगितले, की आर्ट बिटस् ही संस्था गेली वीस वर्षे चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला या विभागातील कला आणि कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून कलाकारांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. देशभरातील कलाकार संस्थेशी जोडले गेले आहेत.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!