पुणे, दि. 25( punetoday9news):- वीज ग्राहकाच्या मीटरमध्ये ०० ते ३० पुणे : युनिटपर्यंतच वीजवापर होत असल्यास त्या मीटरची महावितरणकडून तपासणीची मोहीम राबविण्यात येत आहे .
राज्यात असे सुमारे ४३ लाख ग्राहक महावितरणच्या तपासणी कक्षेत असून , त्यातील काहींच्या मीटरची तपासणी झाली असून , त्यात काही प्रकरणांत मीटरमधील दोष आणि चोरीच्या उद्देशाने फेरफारही समोर येत आहेत . सदोष मीटर तातडीने बदलण्याची कार्यवाही केली जात आहे . त्यातून अनपेक्षित वीजगळती समोर येऊन महावितरणच्या महसुलात भर पडण्यास मदत होत आहे .
वीज देयकांची कोटय़वधींची थकबाकी वसुलीबरोबरच बुडणाऱ्या महसुलात वाढ करण्यासाठी सध्या विविध मोहिमा राबविण्यात येत आहेत .
जास्त युनीट ची नोंद झाल्यास ग्राहक तात्काळ कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंदवतात मात्र सातत्याने ३० युनीट पेक्षा कमी रीडिंग येत असल्यास अथवा मीटर बंद असल्यास तक्रार नोंदवली जात नसल्याने महावितरणचा महसूल बुडत असल्याचे महावितरणचे म्हणने आहे.
Comments are closed